डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन संपन्न

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडले. संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात इतिहास संशोधक आणि विविध संस्थांचा सन्मान करण्यात आला.

May 15, 2026 - 14:55
 0  6
डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन संपन्न
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, डेक्कन स्मारक, मुरलीधर मोहोळ,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन गुरुवारी उत्साहात पार पडले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर

मोहोळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने सकाळी संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आणि पाळणा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच पुण्यातील इतिहास संशोधक आणि नित्यपूजा करणाऱ्या विविध संस्थांचा यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, येत्या एका वर्षात स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील राहील.

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक आणि माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर यांनी सांगितले की, या स्मारकाच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, चरित्र आणि विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक राघवेंद्र मानकर, अपूर्व खाडे, अमृता म्हेत्रे, सुनिल पांडे, निवेदिता एकबोटे, अल्पना वरपे, पृथ्वीराज सुतार, विशाल धनावडे, धीरज घाटे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, नारायण गलांडे, तेजश्री पवळे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, विविध पदाधिकारी, उपायुक्त, स्थानिक नागरिक आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0