नाशिक ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी; मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन
नाशिक ओझर विमानतळ नामकरण, दादासाहेब गायकवाड विमानतळ, गिरीश महाजन बातमी, नाशिक बातम्या, महाराष्ट्र राजकारण, विमानतळ नामकरण मागणी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथील ओझर विमानतळाला रिपब्लिकन सेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आज (दि. १० एप्रिल २०२६) महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन सादर करण्यात आले.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड ओझर विमानतळ नामकरण समिती, नाशिक यांच्या वतीने या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामकरणाचा ठराव मंजूर करून तो अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
मंत्री गिरीश महाजन यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन सादर करताना समितीचे मुख्य निमंत्रक अण्णासाहेब कटारे, समाजभूषण बाळासाहेब शिंदे, आदेश पगारे, नारायण गायकवाड, नंदकुमार जाधव, बिपीन कटारे, बाळासाहेब साळवे, गोरख जाधव, प्रशांत कटारे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0