महाराष्ट्र दहावी निकाल २०२६ जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींची पुन्हा बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (एसएससी) परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर केला असून राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली असून कोकण विभागाने सर्वाधिक ९७.६२ टक्के निकाल नोंदवला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

May 9, 2026 - 01:12
May 10, 2026 - 01:26
 0  17
महाराष्ट्र दहावी निकाल २०२६ जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींची पुन्हा बाजी
महाराष्ट्र दहावी निकाल २०२६, SSC Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) परीक्षा २०२६ चा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातील एकूण १५ लाख ५५ हजार २६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शालेय शिक्षण मंत्री Dadaji Bhuse यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून शिक्षक आणि पालकांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे.

यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलांचा निकाल ८९.५६ टक्के लागला असून मुलींचा निकाल ९४.९६ टक्के लागला आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक आहे.

विभागनिहाय निकालात Konkan Division विभागाने ९७.६२ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर Chhatrapati Sambhajinagar विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.४१ टक्के लागला आहे.

इतर विभागांचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत :

Kolhapur – ९५.४७%

Mumbai – ९४.९७%

Pune – ९४.२४%

Nashik – ९०.५३%

Amravati – ९०.५०%

Nagpur – ८९.०७%

Latur – ८८.४२%

श्रेणीनिहाय निकालात प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २७.४१ टक्के आहे. प्रथम श्रेणीत ३१.२६ टक्के, द्वितीय श्रेणीत २४.६६ टक्के आणि उत्तीर्ण श्रेणीत ८.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान, जे विद्यार्थी गुण सुधार करू इच्छितात त्यांच्यासाठी मंडळाने श्रेणीसुधार आणि गुणसुधार योजनेअंतर्गत पुढील तीन परीक्षांमध्ये संधी उपलब्ध करून दिली आहे. जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ या परीक्षांमध्ये विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकणार आहेत.

अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0