भायखळ्यात फसवणूक करून सोन्याची चैन लंपास करणारा सराईत गुन्हेगार अटकेत
मुंबईतील भायखळा परिसरात बनावट ओळख सांगून ७१ वर्षीय व्यक्तीकडून सोन्याची चैन लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपीवर आधीपासून ५९ गुन्हे दाखल आहेत.
मुंबई - ब्यूरो - अनिल सावरे
मुंबईतील भायखळा परिसरात बनावट ओळख सांगून सोन्याची चैन लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ३० मार्च २०२६ रोजी सकाळी घडली होती.
७१ वर्षीय व्यक्ती गोरई शंकर मिठाई दुकानाजवळून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवले. त्यांनी आपली ओळख ओळखीच्या व्यक्तीप्रमाणे करून विश्वास संपादन केला आणि बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन फसवणूक करून काढून घेतली.
घटनेनंतर पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी नरेश उर्फ नट्या विजयकुमार जयस्वाल (वय ४०) याला अटक केली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ५९ गुन्हे नोंद आहेत.
या कारवाईत भायखळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून पुढील तपास सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0