कोटक एज्युकेशन फाउंडेशन : लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरचा किरणबिंदू; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘कोटक ज्युनियर स्कॉलरशिप 2026-27’
कोटक एज्युकेशन फाउंडेशनतर्फे मुंबई महानगर प्रदेशातील अल्प उत्पन्न गटातील आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘कोटक ज्युनियर स्कॉलरशिप 2026-27’ जाहीर करण्यात आली आहे. दहावीत 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी आणि 12 वीसाठी 73,500 रुपयांची शिष्यवृत्ती तसेच करिअर मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
मुंबई :- मनीषा गुरव चीफ एडिटर
मुंबई : शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्याचे साधन नसून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. आधुनिक युगात शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि व्यक्ती स्वावलंबी बनते. मात्र अनेक गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडचणी हे शिक्षणातील मोठे आव्हान ठरते. अशा विद्यार्थ्यांसाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशन गेल्या 19 वर्षांहून अधिक काळापासून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदतीचा हात देत आहे.
कोटक एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘कोटक ज्युनियर स्कॉलरशिप 2026-27’ ही शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग तसेच पालक नसलेल्या किंवा सिंगल पालक असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही योजना विशेष लाभदायक ठरणार आहे.
दहावीच्या परीक्षेत 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या शिक्षणासाठी एकूण 73 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख 20 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
विशेष बाब म्हणजे ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीच्या कालावधीत शैक्षणिक मार्गदर्शन, मेंटॉरशिप, करिअर काउन्सेलिंग, इंडस्ट्री एक्सपोजर भेटी तसेच विविध कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कायम राहून त्यांना उच्च शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळविण्यास मदत होते.
कोटक एज्युकेशन फाउंडेशन दरवर्षी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दहावीचे गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला आणि महाविद्यालयीन प्रवेशाची माहिती तयार ठेवून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 8779020452 किंवा 9372654601 या क्रमांकांवर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा. अर्ज प्रक्रियेसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिला जाणार असून आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले आहे.
गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती उच्च शिक्षणाचे आणि उज्ज्वल करिअरचे ‘गोल्डन तिकीट’ ठरू शकते.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0