नाशिक शहरात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाला सुरुवात; महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्याकडून प्रगणना अर्ज भरून मोहिमेचा शुभारंभ
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला नाशिक शहरात सुरुवात झाली. महापौर हिमगौरी आडके-आहेर यांचा प्रगणना अर्ज भरून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
नाशिक ब्यूरो : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला नाशिक शहरात आज औपचारिक सुरुवात झाली. नाशिकच्या प्रथम नागरिक तथा महापौर हिमगौरी आडके-आहेर यांचा प्रगणना अर्ज भरून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाभर आजपासून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या घरभेटी सुरू झाल्या आहेत. त्यानुसार महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्याकडून प्रगणना अर्ज भरून घेण्यात आला. यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी अमोल निकम आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सारिका आहेर उपस्थित होत्या.
यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर म्हणाल्या की, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक असणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार असल्याने नागरिकांनी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून देत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.
या मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूकपणे नोंदविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाचे अधिकारी आणि बीएलओ नागरिकांच्या घरी भेट देऊन Enumeration Form भरून घेतील. नागरिकांनी या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देत योग्य माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही महापौरांनी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0