वसंतराव नाईक जयंतीनिमित्त विधानभवन आणि मंत्रालयात अभिवादन; मुख्यमंत्री फडणवीसांसह मान्यवरांची उपस्थिती

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन आणि मंत्रालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री आणि विविध मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Jul 1, 2026 - 18:47
 0  6
वसंतराव नाईक जयंतीनिमित्त विधानभवन आणि मंत्रालयात अभिवादन; मुख्यमंत्री फडणवीसांसह मान्यवरांची उपस्थिती
वसंतराव नाईक, वसंतराव नाईक जयंती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | प्रतिनिधी संदीप गिरकर 

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन आणि मंत्रालयात विविध मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

विधानभवनातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, तसेच विधिमंडळ सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही विधानभवन परिसरात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कक्ष अधिकारी निलेश हरड, संदेश उतेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे, अमोल चव्हाण, विनोद सोरटे तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकासाला नवे दिशादर्शन करणारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1