मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सहकार्य करावे : आयुक्त अश्विनी भिडे
बृहन्मुंबईत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, तसेच ३० जून ते २९ जुलैदरम्यान बीएलओंच्या गृहभेटी यशस्वी करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.
मुंबई प्रतिनिधी | नरेश शिंदे
मुंबई | प्रतिनिधी : बृहन्मुंबईत सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन - SIR) प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, तसेच ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या गृहभेटीदरम्यान अधिकाधिक मतदारांची गणना होण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत त्या बोलत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू असून त्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल, सहआयुक्त विश्वास शंकरवार तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अश्विनी भिडे यांनी सांगितले की, बीएलओ ३० जून ते २९ जुलैदरम्यान घराघरांत जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. यावेळी मतदारांनी आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे. कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होऊ नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचे वेळापत्रक, कार्यपद्धती आणि अंमलबजावणीबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवरही प्रशासनाने चर्चा करून आवश्यक स्पष्टीकरण दिले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0