संविधान हत्या दिन’ निमित्त दिघीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान; आणीबाणीच्या इतिहासावर प्रकाश
आणीबाणीच्या ५१व्या वर्षानिमित्त दिघी येथे ‘संविधान हत्या दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या विशेष व्याख्यानात शिवव्याख्याते शुभम खेडेकर यांनी आणीबाणीच्या कालखंडाविषयी मार्गदर्शन केले.
पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे
आणीबाणी लागू होऊन ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आणीबाणीचे ५१ वे वर्ष’ आणि ‘संविधान हत्या दिन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आणीबाणीच्या कालखंडाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा होता.
दिघी येथील राघव मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्याख्यानादरम्यान शुभम खेडेकर यांनी २५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा ऐतिहासिक संदर्भ, त्या काळातील घटनाक्रम आणि त्याचा भारतीय लोकशाहीवर झालेला परिणाम याविषयी आपले विचार मांडले. संविधानाचा आदर राखणे आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आणीबाणीच्या कालखंडाबाबत विविध प्रश्न विचारून विषयाची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमात उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास आणीबाणीचे ५१ वे वर्ष अभियानाचे जिल्हा संयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे, जिल्हा सरचिटणीस विकास डोळस, आयोजक नगरसेवक उदय गायकवाड, माजी उपमहापौर हिराबाई घुले, जिल्हा सहसंयोजक दिनेश यादव, उपाध्यक्ष संजय पटणी, कैलास सानप, रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक विनोद वाळके, नगरसेवक कृष्णाजी सुरकुले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष तापकीर, मंडल अध्यक्ष प्रमोद परदेशी, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश विरणक, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सुशांत पवार, हृषिकेश भालेकर, अमित महाडिक, प्रमोद पठारे, दादासाहेब चितळे तसेच अनेक पदाधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन दादासाहेब चितळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उदय गायकवाड यांनी मानले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0