भटके विमुक्त विकास परिषद सदस्यांची राज्यपालांसोबत विविध प्रश्नांवर चर्चा
भटके विमुक्त विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेऊन अतिमागास भटक्या विमुक्त समाजाच्या शिक्षण, आरोग्य आणि कागदपत्रांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा केली.
मुंबई, दि. १३ :
भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील अतिमागास भटक्या विमुक्त समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.
यावेळी राज्यपालांनी अतिमागास भटक्या विमुक्त समाजातील प्रतिनिधींना लोकभवन येथे निमंत्रित करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आश्वासन दिले.
बैठकीदरम्यान शिक्षण, आरोग्य, शासकीय नोंदीसंबंधी कागदपत्रे तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
परिषदेच्या सदस्यांनी राज्यपालांना यमगरवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील एकलव्य विद्या संकुलाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. तसेच ३१ ऑगस्ट रोजी आयोजित विमुक्त दिन कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. या कार्यक्रमात जातीचा दाखला, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी, कार्यवाह नरसिंग झरे, कोषाध्यक्ष नरेश पोटे, विदर्भ संयोजक राजेंद्र दोनाडकर, प्रांत सहसंयोजक शरद मखर आणि राहुल चव्हाण उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
